Friday, 11 March 2011

गाभारा ..





चंदनाचा धूर |  मंत्रांचे काहूर|
भावनांचा पूर |  वाहू लागे ||


मिटलेले डोळे | भक्तीचे उमाळे |
वासनेचे चाळे | मनामाजी ||


श्रद्धेचे प्रताप | क्षणोक्षणी पाप |
पुण्याचेच माप | दानपेटी ||


लोपला विवेक | भ्रष्टले प्रतीक |
देवही नास्तिक | गाभार्यामध्ये ||

Monday, 28 February 2011

मुक्त

देहाच्या कुडीत धपापलेला श्वास,
रोजचे मरण जगण्याचा ध्यास.

देहाचे सोह;e सौंदर्याची आरास,
पोटभर भुकेसाठी आभा;भर घास.

क्षणा-क्षणांत भरलेला शाश्वताचा भास,
उद्याच्याही उद्यामध्ये असण्याची आस.

कधी तरी हा अंधार धरेल प्रकाशाची कास,
कधी तरी मीसुद्धा होइन मुक्त...........

Thursday, 6 August 2009

हुकुम..........!

ज्यांनी महाराष्ट्र घडवला तेच जर कधी महाराष्ट्रात..........राजधानीत (मुंबईमध्ये) आले तर काय होईल???????याच प्रश्नाचा घेतलेला हा आढावा!!!!!!



स्वर्गामध्ये बसुनी जेव्हा वदले त्रती,पाहुनी येऊ महाराष्ट्राची जाली काय गती;
विचार करुनी त्वरेने उतरले धरणीवरती,परी बावरले मराठी कुणी दिसेना अवतीभवती!

पहिल्यांदा वाटले आपल्या उतरण्यातच जाला काही कहर;
पण मागाहून समजले हे तर आपलेच मुंबई शहर !!!

इथे मराठ्यांनाच वाटत होती मराठीची लाज;
फिरंगयानी कधीच काबिज केला होता मराठी साज!

रागाने पेटले मस्तक,त्यांना सुचेना काय करावे;
त्या भरात वाटले एकेकाचे डोकेच मारावे!!!!!!

पण तोंडावर आलेला हुकुम त्यांच्या तोंडातच विरघलला;
कारण त्यांच्या आद्न्यापलनासाठी तिथे एकही मराठा नव्हता उरला
...........