ज्यांनी महाराष्ट्र घडवला तेच जर कधी महाराष्ट्रात..........राजधानीत (मुंबईमध्ये) आले तर काय होईल???????याच प्रश्नाचा घेतलेला हा आढावा!!!!!!
स्वर्गामध्ये बसुनी जेव्हा वदले छत्रपती,पाहुनी येऊ महाराष्ट्राची जाली काय गती;
विचार करुनी त्वरेने उतरले धरणीवरती,परी बावरले मराठी कुणी दिसेना अवतीभवती!
पहिल्यांदा वाटले आपल्या उतरण्यातच जाला काही कहर;
पण मागाहून समजले हे तर आपलेच मुंबई शहर !!!
इथे मराठ्यांनाच वाटत होती मराठीची लाज;
फिरंगयानी कधीच काबिज केला होता मराठी साज!
रागाने पेटले मस्तक,त्यांना सुचेना काय करावे;
त्या भरात वाटले एकेकाचे डोकेच मारावे!!!!!!
पण तोंडावर आलेला हुकुम त्यांच्या तोंडातच विरघलला;
कारण त्यांच्या आद्न्यापलनासाठी तिथे एकही मराठा नव्हता उरला...........
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment